नागपूर : 200 रुपयांची लाच, लाचखोर ट्रॅफिक कॉन्स्टेबल भुजंगराव थाटे निलंबित
नागपूरला लाच घेताना सोशल मीडियावर व्हायरल झालेले ट्रॅफिक कॉन्स्टेबल भुजंगराव थाटे यांना निलंबित करण्यात आलंय... वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी थाटे यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत... व्हिडीओत कॉन्स्टेबल थाटे एका सिग्नल तोडलेल्या वाहनचालकाकडून सहाशे रुपयांची मागणी करत होते.. अखेर तडजोड करत थाटे 300 रुपयांपर्यंत तयार झाले... पण वाहतूक चालकाकडून 200 रुपये स्वीकारताना थाटे कॅमेऱ्यात कैद झाले... आणि हा व्हीडिओ सोशल मीडियावर आज सकाळपासून व्हायरल झाला.... आणि लगेचच वाहतूक विभागाकडून थाटेंवर कारवाई करण्यात आलीय...