Nagpur Threat | खुल्या प्रवर्गातल्या गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या, नागपुरात सिटी बस स्टॉपवर भारत सरकारला धमकी | नागपूर | ABP Majha
या मजकुरात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या नाहीत तप परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी यातून देण्यात आली आहे. यमराजाचं बोट बॉम्बच्या रिमोटवर आहे, "धमकी जर गांभीर्यानं घेतली नाही तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देवाघरी पोहचवू" असंही या धमकीच्या कागदावर म्हटलं आहे. बस स्टॉप वर तीन पानी धमकी आज सकाळी काही लोकांना दिसून आली तेव्हा हे प्रकरण समोर आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती महामार्गावरील कॅम्पसच्या अगदी समोर असलेल्या बस स्टॉपवर देखील हे धमकी पत्र चिटकवण्यात आले आहेत.