नागपूर : कोळसा व्यापाऱ्याचे 70 लाख घेऊन वाहनचालक फरार
Continues below advertisement
कोळसा व्यापाऱ्याचे ७० लाख रुपये घेऊन त्याचाच वाहनचालक पसार झाल्याची घटना नागपूरात घडलीय. निलेश पखाले असं या ड्रायव्हरचं नाव आहे. उपरेंनी ७० लाखांची रोकड निलेश पखालेकडे दिली होती. रोकड घेऊन मीटिंगच्या ठिकाणी बोलावलं असतानाही ड्रायव्हर तिथं पोहचला नाही. दरम्यान नितीन उपरे यांची कार त्यांच्याच घराच्या खाली पार्क केलेली आढळून आली. ड्रायव्हरच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Continues below advertisement