कोकण, मुंबई आणि विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा ताप
Continues below advertisement
मुंबईसह कोकण आणि विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. रायगड जिल्ह्यातल्या भिरामध्ये काल तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुंबईतही तब्बल ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिकडे मुंबई, पुणे, नाशिकमध्येही उन्हानं लोक हैराण झाले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा 42 अंशावर पोचल्यानं येणाऱ्या काळात उन्हाचा तडाखा चांगलाच बसण्याची भीती आहे. आतापर्यंत या महिन्यात नोंदवलेलं हे सर्वाधिक तापमान आहे. त्यामुळे दुपारी उन्हात घराबाहेर पडताना काळजी घ्या.
Continues below advertisement