Tarun Bharat criticizes Sanjay Raut | 'तरुण भारत'मधून संजय राऊतांवर टीकास्त्र | ABP Majha
Continues below advertisement
'सामना'तून भाजपवर होणाऱ्या टीकेला 'तरुण भारत' वृत्तपत्रातून उत्तर देण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी 9 वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवश मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची? अशी टीका तरुण भारतच्या अग्रलेखातून संजय राऊतांवर करण्यात आली आहे.
Continues below advertisement