नागपूर : संघविरोधी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु, सुरेंद्र गडलिंग यांचा आरोप

Continues below advertisement
आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नक्षल कनेक्शनच्या संशयावरुन पोलिसांनी सुरु केलेल्या छापेमारीची..
पुणे, मुंबई आणि नागपुरात कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरावर पोलिसांनी धाडी टाकल्यात.
नागपुरात अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरुय. तर मुंबईत सुधीर ढवळे आणि हर्षाली पोतदारांच्या घरी पोलीस तपास करतायत.
तिकडं पुण्यात रमेश गायचोर आणि सागर गोरखेच्या घरीही सकाळपासून पोलिसांनी छापासत्र सुरु केलंय. यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी कबीर कला मंचच्या सदस्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या सीडीचे, पेन ड्राईव्ह, कोरेगाव भीमाच्या इतिहासाबद्दलची पुस्तकं आणि एल्गार परिषदेत वाटलेली पत्रकं ताब्यात घेतलीयत. नागपूरचे अॅड.सुरेंद्र गडलिंग गेल्या 20 वर्षांपासून नक्षलवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या केसेस लढतायत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram