नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा इशारा

Continues below advertisement
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुन्हा एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

नागपूरमध्ये 'रामगिरी' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एका व्यक्तीनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं. नागपूर महापालिकेत काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या संबंधित व्यक्तीने नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला.

नागपूर महापालिकेतून अनुशासनात्मक कारवाई करुन नोकरीवरुन काढून टाकलेल्या सात जणांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. आपल्याला नोकरीत पुन्हा घ्यावं, अन्यथा आत्मदहन करु, असा इशारा त्यांनी दिला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram