नागपूर : विदर्भात कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू, सरकारकडून कृषीसंजीवकांवर बंदी
Continues below advertisement
विदर्भात कीटकनाशकांमुळे 30 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारनं एका रात्रीत अध्यादेश काढून कृषी संजीवकांवर बंदी घातली आहे. ज्यामुळे निर्माते, विक्रेते आणि कृषी सेवा केंद्रांना 1 हजार कोटी रुपयाचा फटका बसला आहे. सरकारच्या आदेशानंतर विक्रेत्यांनी कोट्यवधींचा माल परत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांचा व्यवसाय 30 ते 40 टक्क्यांनी घटला आहे. आतापर्यंत जवळपास 150 कोटींची कृषीसंजीवके कंपन्यांना परत कऱण्यात आली आहेत. कापूस, भाज्या, डाळींबं, द्राक्षांच्या योग्य वाढीसाठी कृषी संजीवके काम करतात. तसंच जमिनीतली पीएच मात्रा कायम ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.
Continues below advertisement