नागपूर : अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन, चाहत्यांकडून श्रद्धांजली
Continues below advertisement
अभिनय आणि नृत्यानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी अकाली घेतलेली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांच्या पश्चात पती बोनी कपूर, मुली खुशी आणि जान्हवी असा परिवार आहे.
Continues below advertisement