नागपूर : वेगळा विदर्भ फक्त रिपब्लिकन पक्षच देऊ शकतो, श्रीहरी अणेंचं वक्तव्य
Continues below advertisement
काँग्रेस आणि भाजप दोघेही वेगळे विदर्भ राज्य देऊ शकत नाहीत. वेगळा विदर्भ फक्त रिपब्लिकन पक्षच करू शकतो असं मत विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी मांडलंय. विदर्भ मिरर साप्ताहिकच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्तच्या कार्यक्रमात अणे बोलत होते,
यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. ‘विदर्भ मिरर’ हे साप्ताहिक खास श्रीहरी अणे यांच्या प्रेरणेतून वेगळ्या राज्याच्या लढ्याला मदत म्हणून सुरु करण्यात आले आहे. यावेळी विदर्भ ही दुभती गाय असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.