नागपूर : पुरवणी मागण्यांमध्ये बुलेट ट्रेनसाठी 250 कोटींची तरतूद : अनिल परब

Continues below advertisement
युती सरकारच्या 3 वर्षांच्या कार्यकाळात राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचं चित्र आज पावसाळी अधिवेशनात दिसून आलं... कारण या 3 वर्षांमध्ये सरकारनं विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्याचं समोर आलं आहे.
खरं तर अर्थसंकल्पावेळी योजनांसाठी आर्थिक तरतूद केली जाते... पण त्यानंतरही प्रत्येक अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाव्यतिरिक्त मागण्यांचा पाऊस पडल्याचं दिसतंय...
आतापर्यंत या सरकारने एकूण 14 अधिवेशनांमध्ये मिळून तब्बल 1 लाख 56 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. तर आजच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी 11 हजार 445 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या... यंदाच्या मागण्यांमध्ये दोन हेलिकॉप्टर खरेदीसाठी 159 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली... अधिवेशनाच्या आयोजनासाठी 1 कोटी 14 लाखांची तरदूत केली... तर निवृत्त पत्रकारांच्या पेन्शनसाठी 15 कोटींची तरतूद केली...
पण या खर्चांची आधीच कल्पना असताना शिलकीच्या अर्थसंकल्पातून त्यासाठी तरतूद का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram