नागपूर : पार्किंग नियम तोडणाऱ्यांचे फोटो पाठवा, दंडाची अर्धी रक्कम मिळवा!
पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांचा फोटो पाठवा आणि दंडाची अर्धी रक्कम मिळवा, असा प्रस्ताव संसदेत मांडल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली. या योजनेमुळे तरी नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणाऱ्यांना चाप बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.