नागपूर : यश बोरकर हत्याकांड प्रकरणातील आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा
Continues below advertisement
नागपूर : नागपूरमधील 11 वर्षीय यश बोरकर हत्याकांड प्रकरणात आरोपी संतोष कालवे याला नागपूर सत्र न्यायालयाने दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
21 वर्षीय संतोष कालवेने आपल्याच घराच्या जवळ राहणाऱ्या 11 वर्षीय यश बोरकरचे जून 2013 मध्ये अपहरण केले होते. यावेळी आरोपी संतोषने यशच्या वडिलांकडे तब्बल 2 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. पण त्यानंतर पोलिसांनी तात्काळ संतोषला अटक केली होती. यावेळी चौकशीत आपणच यशचं अपहरण करुन त्याची हत्या केल्याची कबुली संतोषने दिली होती.
संतोषने अपहरण करुन अत्यंत क्रूर पद्धतीने यशची हत्या केली होती. यावेळी त्याच्या अंगावर तब्बल 22 चाकूचे वार करण्यात आले होते. यशला जीवे मारल्यानंतर तब्बल चार तासांनी त्याने त्याच्या वडिलांना खंडणीसाठी फोन केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटकही केली होती.
या संपूर्ण प्रकरणी सत्र न्यायालयाने आज अपहरण आणि हत्या यासाठी दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान, यशच्या पालकांनी कोर्टाच्या या निकालाचे स्वागत केले. मात्र, आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.