नागपूर : शहीद राजगुरु संघ स्वयंसेवक होते, माजी संघ प्रचारकाचा दावा

इंग्रजांविरोधात लढताना प्राणाची आहुती देणारे शहीद राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा खळबळजनक दावा संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. सँडर्सच्या हत्येनंतर शहीद राजगुरु हे नागपुरातील संघ मुख्यालयात येऊन गेले होते, असंही त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकाच्या आधारे सहगल यांनी संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे वाटप आता संघाच्या स्वयंसेवकांमध्ये केले जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola