नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट, तापमान 44 अंशांवर

Continues below advertisement
उष्णतेनं होरपळणाऱ्या विदर्भावर आता हिट व्हेवचं संकट घोंगावतंय. विदर्भातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट पसरायला सुरुवात झाली आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जाणवणार आहे. सध्या अमरावती आणि चंद्रपूरचं तापमान 44 अंश सेल्सिअस पोहोचलंय. त्यामुळे इतर जिल्ह्यांचाही पारा पुढील दोन ते तीन दिवसांत 45 अंश से.पलीकडे जाण्याचा अंदाज आहे. साधारणपणे उष्णतेची लाट टप्प्याटप्प्याने येते. त्यामुळे रविवारपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झालेली बघायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram