नागपूर : युती न केल्यास शिवसेनेचे आमदार पक्ष सोडतील : आठवले
आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर शिवसेनेत उभी फूट पडेल असं भाकित रिपाइंचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. गेली अनेक वर्ष एकमेकांसोबत निवडणुका लढवणाऱ्या दोन्ही पक्षांची युती राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिवसेनेनं युती करण्यास नकार दिला तर सेनेचे अनेक आमदार पक्षाची साथ सोडतील असंही आठवलेंनी म्हटलं.