नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट राजू नारंग यांची सहकाऱ्याकडूनच हत्या झाल्याचं समोर
Continues below advertisement
नागपुरातल्या खाजगी कंपनीतील अकाउंटंट राजू नारंग यांच्या हत्या प्रकरणात एक नवा खुलासा समोर आला आहे... राजू नारंग यांच्या कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या टीममध्ये काम करणाऱ्या राजू नथवानी यानेच त्यांची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं... राजू नथवानी योग्य रितीने काम करत नसल्याने राजू नारंग नेहमी त्याला रागवायचे... आणि त्याचाच राग मनात धरून राजू नथवानीने राजू नारंग यांची हत्या केली... आणि त्यांचा मृतदेह मौदा येथील नदीत फेकून दिला... पोलिसांनी राजू नारंग यांच्या हत्येप्रकरणी राजू नथवाणीसह 5 लोकांना अटक केलीय.. 27 डिसेंबरपासून बेपत्ता झालेल्या राजू नारंग यांचा मृतदेह 1 जानेवारीला मौदा येथील नदीत सापडला होता...
Continues below advertisement