नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील रुफटॉप हॉटेलवर पोलिसांची छापेमारी
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर धाड टाकण्यात आली आहे. या रुफ टॉप हॉटेलला कोणतीही परवानगी नसताना याठिकाणी सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होतं. ज्यावेळी धाड टाकली गेली, त्यावेळी अनेक तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आले. धरमपेठ भागातल्या रुफ नाईन, असं या हॉटेलचं नाव आहे. हा परिसर अतिशय व्हीव्हीआयपी मानला जातो.. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच अशा अनधिकृतपणे हॉटेली कुणाच्या आशीर्वादानं उभ्या राहिल्या, हा प्रश्नच आहे.
Continues below advertisement