UNCUT | नागपूरच्या सभेतील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं संपूर्ण भाषण | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेत आल्यास चौकशी होईल आणि चौकीदार जेलमध्ये जाईल, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. नागपुरात आज काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ महाआघाडीची सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली. मोदींचं वय झालं आहे. त्यांना सगळं लवकर करायचं आहे त्यामुळे ते खोटं बोलतात, असा टोलाही राहुल यांनी लगावला. छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि राजस्थानचा दाखला देत, सत्ता आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचं कर्म माफ करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. अल्प उत्पन्न हमी योजनेद्वारे देशातील गरिबाला कुठल्याही परिस्थितीत महिला 12 हजार रुपये देण्याचं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिलं.