नागपूर: राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसतात, विखे पाटलांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. यावेळी स्पष्टीकरण देताना एका मंत्र्याच्या शहरात ‘मंडी टोळी’ नावाची कुख्यात टोळी कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट केलाय.
या टोळीकडे 4 हजार शस्त्रं आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग ही टोळी करते अशी माहितीही त्यांनी विधानसभेत दिली. तसेच या टोळीला राज्यातील मंत्र्यांचाच पाठिंबा असल्याचं विखे-पाटील यांनी म्हंटलं आहे.