नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विधानभवनाबाहेर आंदोलन
Continues below advertisement
नागपूर येथे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सरकारविरोधात आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आलं. सकाळी ११नंतर विदर्भवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी सकाळपासून छोट्या छोट्या समूहात विभागून आंदोलन सुरु केले..काही व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. दरम्यान, व्हरायटी चौकात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन करणाऱ्या सुमारे ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अनेकांना अक्षरशः फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बंद करण्यात आले. यावेळी 'विदर्भविरोधी आमदारांनो परत जा'च्या घोषणा या आंदोलकांनी दिल्या.
Continues below advertisement