नागपूर : विदर्भ बंदची हाक, 50 विदर्भवादी पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांनी विदर्भ बंदची हाक दिली. परंतु आंदोलकांना पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी आंदोलकांनी जबरदस्तीने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी 50 विदर्भवाद्यांना अटक केली आहे. आंदोलनाला परवानगी न घेता, व्यापाऱ्यांना, दुकानदारांना दुकानं बंद करण्याचे अधिकार कुणालाही नाहीत, असं सांगत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घालत धक्काबुक्की केली. तर, पोलिसांनी बळाच्या जोरावर आंदोलन चिरडल्याचा प्रयत्न केल्यामुळे आंदोलक चिडले आहेत.
Continues below advertisement