नागपूर : नक्षलवाद्यांचे खटले लढणारे वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी छापा
नक्षलवाद्यांच्या केसेस लढण्यासाठी प्रसिद्ध असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकलाय. गेल्या तासाभरापासून त्यांच्या घराची पोलीस कसून तपासणी करतायत. गडलिंग गेल्या 20 वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या केसेस लढतायत. पुणे पोलिसांच्या टीमने ही धाड टाकल्याचं सांगितलं जातंय.