नागपूर : पैसे आणि शेतीच्या वादातून पवनकर कुटुंबाची हत्या, आरोपीची कबुली

Continues below advertisement
राज्याला हादरवून टाकणाऱ्या पवनकर कुटुंबाच्या हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. आरोपी विवेक पालटकर याला फक्त कमलाकर पवनकर यांची हत्या करायची होती. मात्र, हत्याकांडासाठी आरोपीने लांब लोखंडी पहार वापरली. त्यामुळे कमलाकर यांच्या शेजारी झोपलेल्या वेदांती आणि कृष्णा या दोन मुलांचाही मृत्यू झाला. या प्रकारानं जागे झालेल्या अर्चना आणि नंतर मीराबाई यांनाही आरोपीनं संपवलं. कमलाकर पवनकर हे आरोपीच्या मुलाचा सांभाळ करायचे. त्यासाठी कमलाकर विवेककडे सतत पैशाची आणि शेतीत हिस्सा देण्याची मागणी करायचे. या रागातून हे हत्याकांड घडवल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. दरम्यान, ११ जूनला झालेल्या या हत्याकांडानं नागपुरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. नागपूर पोलिसांनी आरोपीला लुधियानातून अटक केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram