नागपूर : आरोपी मुन्ना यादव पोलिसांपेक्षाही फास्ट, नागपूर पोलीस सह आयुक्तांचं धक्कादायक उत्तर
नागपूरचा मोस्ट वॉन्टेड भाजप नेता मुन्ना यादव का सापडत नाही याचं उत्तर मिळालं आहे. कारण तो पोलिसांपेक्षाही फास्ट आहे. खुद्द नागपूर पोलिसांनी ही धक्कादायक कबुली दिली आहे. एका मारहाणीच्या प्रकरणात भाजप नेता मुन्ना यादव सध्या फरार आहे. आम्ही फरार आरोपींचा नेहमी शोध घेत असतो. मुन्ना यादवचाही आम्ही शोध घेत आहोत. मात्र तो मिळून येत नसल्याचं नागपूरचे पोलिस सह आयुक्त शिवाजी बोडखे यांनी म्हटलं आहे.