नागपूर : सिताबर्डी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
नागपूरच्या सिताबर्डी फेरीवाल्यांनी एका दाप्मत्याला मारहाण केल्याचा प्रकार एबीपी माझाने समोर आणल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज बाजारपेठेत फिरुन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यातबरोबर फुटपाथ व्यापणाऱ्या फेरीवाल्यांचं साहित्य जप्त केलं. मात्र, त्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई केली नाही, त्यामुळे आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे काल फेरीवाल्यांनी दाम्पत्याला मारहाण केल्यानंतर, चिल्लर घटनांची दखल का घेता असं उत्तर पोलिसांनी आम्हाला दिलं होतं.
Continues below advertisement