EXPLAINER VIDEO | RTM नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संघाचा इतिहास | ABP Majha

Continues below advertisement
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बीएचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामध्ये लक्षवेधी ठरतो आहे नुकताच अभ्यासक्रमात सामील करण्यात आलेला विषय - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र निर्माणात योगदान. हा नवीन अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून शिकवण्यात येणार असल्याची माहिती आहे. याआधी अभ्यासक्रमात असलेले दोन विषय - नेचर ऑफ मोडरेट पोलिटिक्स आणि राईज अँड ग्रोथ ऑफ कम्युनलिजम - या सत्रापासून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रनिर्माणातील योगदान याबद्दल माहिती नव्याने सामील करण्यात आली आहे. विद्यापीठात राजकीय पक्षांशी संलग्न संघटना कार्यरत आहेत. नागपूर विद्यापीठात संघ परिवारातील शिक्षण मंचाचे वर्चस्व बघता या बदलाला लगेच राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. मात्र अभ्यासक्रमातील हा एकमेव बदल नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram