VIDEO | नागपुरात ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवताना सीसीटीव्ही बंद : नाना पटोले | एबीपी माझा
नागपुरात आणलेले ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ठेवताना तिथले सीसीटीव्ही बंद ठेवण्यात आले होते असा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केले आहेत. नागपुरात पत्रकार परिषद घेत, नाना पटोलेंनी सीसीटीव्हीच्या एलसीडीचं आऊटपूट मिळाल्याचा दावा केलाय. नागपुरात आणलेल्या ईव्हीएम मशिनवर भाजपच्या झेंड्यासारखं कापड होतं असा आरोपही पटोलेंनी केलाय. या प्रकरणी नाना पटोलेंनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय.