नागपूर : मुंबई-नागपूरदरम्यान हायस्पीड ट्रेन सुरु करण्याचा रेल्वेमंत्र्यांचा प्रस्ताव
नागपुर ते मुंबई दरम्यान समृद्धी एक्स्प्रेससोबत सुपर हायस्पीड ट्रेन सुरु करु करता येईल. ज्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवास पाच ते सहा तासात शक्य होईल. अशी घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. नागपूरमध्ये आज देशातील पहिल्या ब्रॉडगेज मेट्रोचा सामंजस्य करार झाला आणि त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी गोयल बोलत होते. गोयल यांनी राज्य सरकारसमोर प्रस्ताव ठेवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्याला होकार दिला आहे. त्यामुळे यासंदर्भातला अधिकृत निर्णय़ही आजच घेतला जाऊ शकतो. आज ब्रॉडगेज मेट्रोचं भूमीपूजन झालं. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपुरहून रामटेक, काटोल, सावनेर, भंडारा वर्धा इथंपर्यंत मेट्रो धावू शकणार आहे.