नागपूर: अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी केली?
मुंबईच्या अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या जागतिक शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचं पुढे आलं आहे. केंद्रीय पर्यावरण खात्यानं दिलेल्या परवानगी पत्रात याचा स्पष्ट उल्लेख असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी नागपूर अधिवेशनात शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची कमी केल्यावरुन वाद झाला होता. मात्र पुतळ्याची उंची इंचभरही कमी होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र केंद्रीय पर्यावरण खात्याच्या परवानगी पत्रात पुतळ्याची उंची कमी करुन चबुतऱ्याची उंची वाढवण्यात आली आहे.