नागपूर : अफवांचं लोण विदर्भात, पोलीस वेळीच पोहोचल्याने अनर्थ टळला
Continues below advertisement
महाराष्ट्रात सुरु असलेलं अफवांचं लोण काहीकेल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. आता हे लोण थेट विदर्भात जाऊन पोचलंय. नागपूर जिल्ह्यात पारशिवनी गावात मुले चोरण्याच्या संशयावरुन जमावाने एका महिलेला जबर मारहाण केली. मात्र पोलिस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. संबंधित महिला गावातून जात असताना मुलांनी तिची वेशभूषा बघून चोर-चोर ओरडण्यास सुरवात केली. मुलांच्या आवाजाने परिसरातील महिला-पुरुष गोळा झाले... त्यांनी संबंधित महिलेला घेरून प्रश्न विचारण्यास सुरवात केली..मात्र सध्या मुले चोरणाऱ्या अफवा असल्याने जमावाने तिला चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली..
Continues below advertisement