नागपूर : विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना अडथळा. मेट्रोच्या कामाला ब्रेक

Continues below advertisement
मार्च महिन्यात मेट्रोतून प्रवास करण्याचं नागपूरकरांचं स्वप्न तुर्तास थोडं कठिण दिसतं आहे. याचं कारण हिंगणा भागातील मेट्रोच्या कामाला नागपूर विमानतळानं रेड सिग्नल दिला. त्यामुळे हिंगण भागातील 1 किलोमीटरपर्यंतचं काम थांबवण्यात आलं. मेट्रोची उंची ही विमानांना अडथळा ठरण्याची शक्यता बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून वर्तवण्यात आली. आणि त्यामुळेच कामाला ब्रेक लागला. दरम्यान मेट्रोचं निम्म काम झालं. मेट्रो मार्चमध्ये धावणार अशी घोषणा झाल्यानंतर विमानतळाच्या हरकतींमुळे नागपूर मेट्रो प्रकल्प घाई घाईत मंजूर झाला नाही ना असा प्रश्न निर्माण होतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram