नागपूर : धावण्याआधीच मेट्रोने 80 कोटी रुपये कमावले
नागपूर मेट्रोने धावण्याआधीच तब्बल 80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अन्य मेट्रोने आतापर्यंत प्रवासी भाड्यातून पैसे कमावले आहेत. मात्र, धावण्यापूर्वीच नागपूर मेट्रोने मोठी कमाई केल्याने चर्चा सुरु आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, मटेरियल टेस्टिंग, आणि टीओडी पॉलिसीमधून हे पैसे मिळवले आहेत. त्यामुळे भविष्यात प्रवाशांकडून कमी भाडे आकारण्यासाठी याची मदत होईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.