नागपूर : ...आणि महादेव जानकरांनी रावसाहेब दानवेंचे पाय धरले!
Continues below advertisement
नागपूरमध्ये आज विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महादेव जानकर यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. यावेळी महादेव जानकर यांनी रासपच्या पक्षाचा तिकिटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला आहे. त्यासंदर्भात आता बैठक सुरु आहे. त्यामुळे जानकर रासपकडून उमेदवारी अर्ज भरतात की इथेही लोटांगण घालत भाजपच्या तिकीटावर अर्ज दाखल करतात हे पाहणं महत्वाचं आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार आहे. त्याचा अर्ज भऱण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
Continues below advertisement