नागपूर : पोलिसाच्या घरात घुसलेला बिबट्या आठ तासांनी बाहेर
Continues below advertisement
नागपुरातील हिंगणा मार्ग सीआरपीएफ गेटजवळील पोलिस नगरात एका घरात शिरलेल्या बिबट्याला पडकण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे. सकाळी 8 वाजता एका घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात संध्याकाळी 5 वाजता यश आलं. तब्बल 9 सात हा थरार सुरु होता. घरातील बाथरुममध्ये हा बिबटल्या शिरला होता. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वनाधिकाऱ्यांसह काही कर्मचारी इथं दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बिबट्याला बाहेर काढण्याचं काम सुरु केलं. मात्र, वेळोवेळी हा बिबट्या आक्रमक रुप धारण करत होता. शेवटी बिबट्याला बेशुद्ध करत त्याला ताब्यात घेण्यात आलं.
Continues below advertisement