नागपूर : सिंचन घोटाळ्याची चौकशी संथ गतीने, हायकोर्टाने सरकारला झापलं
Continues below advertisement
सिंचन घोटाळाप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीच्या मंदगतीवरुन उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं आहे. चौकशीचं मॉनिटरींग पोलिस महासंचालक करतील असा प्रस्ताव कोर्टापुढं ठेवला होता. त्याला आता कोर्टानं एका आठवड्याची मुदत दिली आहे. एका आठवड्यात जर समाधानकारक चौकशी झाली नाही तर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येईल असं न्यायालयाच्या वतीनं सांगण्यात आलंय. सिंचन घोटाळ्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरु आहे.
Continues below advertisement