नागपूर : येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
अधिवेशनाचा कालचा दिवस पाण्यात घातल्यानंतर नागपूरसह विदर्भावर पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचं सावट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून आज नागपुरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपुरात रात्री पावसानं विश्रांती घेतली असली तरी सकाळपासून थांबून-थांबून हलका पाऊस होतोय.
दरम्यान, सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे रामटेक भागातल्या पिडंकेपार गावात वीज कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला. हर्षल चनेकार आणि नागेश्वर मोहुले अशी मृतांची नावं आहेत. याआधी तब्बल २४ वर्षांपूर्वी म्हणजे 1994 साली नागपुरात इतका मोठा पाऊस झाला होता.