VIDEO | माझं मन चोरलं, तरुणाची पोलिसात तक्रार | स्पेशल रिपोर्ट | नागपूर | एबीपी माझा

पोलिसांकडे नेहमीच वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रारी घेऊन लोक न्यायाच्या अपेक्षेने येतात. मात्र, नागपुरात एका तरुणाच्या तक्रारीने पोलिसांनाच चक्रावून सोडलं आहे. तरुणाने केलेल्या या तक्रारीवर सल्लामसलत करुन आता पोलीस अधिकाऱ्यांनीच तरुणासमोर हात जोडत, या समस्येवर आमच्याकडे उपाय नसल्याचं सांगून पिच्छा सोडवला. "दिल चोरी साड्डा हो गया..." किंवा "चुरा लिया है तुमने जो दिल को...." हिंदी चित्रपटातील ही गाणे तुम्ही अनेक वेळा ऐकली असाल. मात्र, नागपुरात एका महाविद्यालयीन तरुणाने काहीशी अशाच आशयाची तक्रार पोलिसांकडे केली. एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या या पठ्ठ्याने पोलिसांकडे तक्रार दिली की संबंधित तरुणीने माझं मन/हृदय चोरलं आहे. मात्र, आता ती त्याच्यापासून नजर चोरत आहे. आता पोलिसांनी त्याचा चोरी गेलेला दिल/मन परत मिळवून द्यावा."
तरुणाच्या या जगावेगळ्या तक्रारीमुळे पोलीस दलातील कनिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले आणि त्यांनी वरिष्ठांकडे जेव्हा मार्गदर्शनाची विनंती केली, तर तेही गोंधळले. आपापसात चर्चा केल्यानंतर हे पोलिसांचे विषय आणि कार्यक्षेत्र नाही, असं दिल/मन चोरीला गेल्याची तक्रार करणाऱ्या तरुणाला कळवण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola