नागपूर : पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जीपीएस आधारित घड्याळ हातावर बांधणं बंधनकारक

Continues below advertisement
नागपूर महापालिकेने अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीवर एक नामी उपाय शोधलाय. महानगरपालिकेने आपल्या सर्व अधिकाऱ्यांना जीपीएस आधारित स्मार्ट घड्याळ बंधनकारक केले आहे. खुद्द आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी सर्व अधिकाऱ्यांना सकाळी १० ते ६ या कार्यालयीन वेळेत ही घड्याळ घालण्याचे निर्देश दिले आहे..या घड्याळ्याच्या माध्यमातून नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, आकस्मिक भेटी, सामूहिक छापे असे अनेक उद्दिष्ट साध्य होणार आहेत
दरम्यान, गेल्या वर्षी महापालिकेने ८ स्वच्छता कमर्चाऱ्यांना अशा जीपीएस आधारित घड्याळे देऊन त्यांच्या माध्यमातून विशिष्ट भागात स्वच्छतेचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले होते... महापालिकेच्या त्या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देखील मिळाला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram