
नागपूर : स्वाभिमानीच्या दूध आंदोलनावर महादेव जानकर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरु केलं आहे. पंढरपूरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत खासदार राजू शेट्टी यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. अनेक प्रमुख शहरांना होणारा दुधपुरवठा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखला आहे. दरम्यान मुंबईच्या दुधपुरवठ्यावर अद्याप याचा कोणतीही परिणाम झाला नसल्य़ाचं दिसत आहे. दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांची दरवाढ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दूधाचा पुरवठा रोखण्यात आलाय. पुण्यात तर रस्त्यावर दूध फेकून देण्यात आलं. दरम्यान, दूग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement