नागपूर : हायप्रोफाईल लग्नांमध्ये महिला चोरट्यांची टोळी सक्रीय
नागपुरातील हायप्रोफाईल विवाह सोहळ्यांमध्ये महिला चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. कळमना भागात नैवैद्यम या पंचतारांकित सभागृहात महिला चोरांच्या या टोळीने ८ लाख रुपयांचे दागिने लंपास केलेत. लग्नात आलेल्या एखाद्या श्रीमंत महिलेले हेरून ही टोळी सतत तिच्या अवतीभवती घुटमळत असतात. लग्नाच्या धामधुमीत संबंधित महिलेचं लक्ष विचलीत होताच तिच्या पर्स कडून विचलित होताच ह्या महिला चोरांच्या टोळीतील एक महिला हळूच पर्स लंपास करतात. त्याच्यातून किंमती ऐवज बाहेर काढून हे चोर महिला लग्न समारंभातून पोबारा करतात. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. .आता या टोळीचा पोलीस शोध घेतायेत