नागपूर : नक्षल्यांविरोधातील सर्वात मोठी कारवाई, गेल्या 48 तासात एकूण 33 नक्षलवाद्यांचा खात्मा

Continues below advertisement
अवघ्या 48 तासांमध्ये गडचिरोलीच्या सी-60 जवानांना आणखी एक यश मिळालं आहे. काल दुपारी झालेल्या कोंम्बिंग ऑपरेशनमध्ये आणखी 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत नक्षलवादी कमांडर नंदू अर्फ वासुदेव आत्राम त्याची पत्नी वड्डेचाही ठार झाल्याची माहिती मिळत आहे. कंठस्नान घातलेल्या 6 नक्षल्यांमध्ये 4 महिला तर 2 पुरुषांचा समावेश आहे. राजाराम खानला परिसरात सी-60 जवानांकडून हे सलग दुसरं ऑपरेशन फत्ते करण्यात आलं. याआधी रविवारीही गडचिरोलीतल्या ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. रविवारी ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये
साईनाथ आणि सिनूचाही समावेश आहे. त्यामुळे केवळ 48 तासांत एकूण 22 नक्षल्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram