नागपूर : रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाचं माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना निमंत्रण

Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर सात जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आलं असून संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकारही केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram