मुंबई : आता जेलमधील कैद्यांना फायबरची भांडी, जेलमधील हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना
लवकरच कैद्यांना फायबर सारखी भांडी दिली जाणार आहेत. मुंबईतल्या आर्थर रोड जेलमधून या उपक्रमाची सुरूवात केली जाईल. गेल्या काही दिवसात कैदी पळून जाण्याची किंवा कैद्यांनी एकमेकांवर हल्ले केल्याच्या घटना बघायला मिळत आहेत. भांड्यांपासून तीक्ष्ण हत्यारं बनवून त्यापासून होणारी हिंसा थांबवण्यासाठी ह्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.