नागपूर : नागपूर-अमरावती मार्गावर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा रास्तारोको
Continues below advertisement
गारपिटीनं नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे तातडीनं करा आणि नुकसान भरपाई द्या. या मागणीसाठी नागपूर-अमरावती रस्त्यावर शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी याठिकाणी रास्ता रोको सुरु केला आहे.
या आंदोलनात भाजपचे आमदार आशिष देशमुखही सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसान भरपाईची पाहणी करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील आमदार आशिष देशमुख नाराज आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेतेही आज गारपीटग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे देखील विदर्भातील गावांना भेट देणार आहेत.