नागपूर : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची सरकारकडून थट्टा
Continues below advertisement
राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना या आत्महत्येची सरकारी कारणं ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. कारण सरकारनं अशी काही कारणं शोधून काढली आहेत. ज्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या जखमेवर सरकारनं मीठ चोळलं आहे. राज्यात लहरी हवामान आणि कर्जबाजारीमुळे 1 मार्च 2018 ते 31 मे 2018 दरम्यान एकूण 639 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण यापैकी 122 प्रकरणं निकषात बसत नसल्यानं अपात्र ठरवली आहेत. या कुटुंबियांना सरकारकडून दमडीही मिळाली नाही. उलट सरकारनं या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अजब कारणांचा शोध लावला आणि सरकारची थट्टा केली आहे.
Continues below advertisement