नागपूर : खाशाबा जाधवांच्या 'पद्मविभूषण' शिफारशीची फाईल गहाळ
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 'पद्मविभूषण'ने सन्मान व्हावा, म्हणून सरकार दरबारी दिलेली फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत आपली व्यथा मांडली. खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण मिळावं, म्हणून पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कुटुंबीयांनी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी तावडेंनी आश्वासन दिल्याचं रणजीत जाधवांनी सांगितलं.
पुरस्कार मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं, पण ती प्रक्रिया करण्यात आली नाही. जाधव कुटुंबीयांनी याबाबत क्रीडा विभागाला विचारणा केली असता, ती फाईल गहाळ झाल्याची माहिती मिळाली.