नागपूर : प्रणव मुखर्जी स्वतःच्याच मुलीच्या निशाण्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2018 12:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाऊन तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी दिली आहे. असं म्हणत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर त्यांच्याच मुलीनं निशाणा साधला आहे. शर्मिष्ठा मुखर्जी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा काल पसरवण्यात आल्या. या वृत्ताचं खंडन त्यांनी केलं. शिवाय प्रणवदांच्या नागपूर भेटीमुळेच या अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हणत त्यांनी वडिलांवरच निशाणा साधला.