नागपूर : गोवंशाची तस्करी करणाऱ्या ट्रकला तस्करांकडूनच आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Apr 2018 03:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गो वंशाची तस्करी करणाऱ्या ट्रकला गो तस्करांनीच आग लावल्याची घटना नागपुरात घडलीय. गो वंशाची तस्करी होत असल्याची माहिती काही लोकांनी पोलिसांना दिली होती. गो तस्करांचे ट्रक नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकात आल्यावर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी पकडलं जाण्याच्या भितीनं गो तस्करांनी ट्रकला आग लावली. धक्कादायक म्हणजे पेटत्या ट्रकमध्ये गाई होत्या. यावेळी पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाईंचे प्राण वाचवले