नागपूर : नाणार प्रकल्पावरुन विधानसभेत विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक, कामकाज तहकूब

Continues below advertisement
नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध करताना आज विरोधकांसह शिवसेना आमदारांनीही सभागृहात जोरदार घोषणाबाजी केलीय. नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका पुन्हा एकदा शिवसनेनं घेतली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आमदारांनी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळाच्या वातावरणातच प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधारी बोलत असतानाही विरोधकांनी गोंधळ सुरुच ठेवला. त्यामुळे आज दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. विधानसभेत बोलताना विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्यात जुंपलेली पाहायला मिळाली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram